देवरवाडी येथे आगीत ६ गवतगंज्या भस्मसात, हजारोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2026

देवरवाडी येथे आगीत ६ गवतगंज्या भस्मसात, हजारोंचे नुकसान

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

दि. २३-०१-२०२६

   शेतकऱ्यांनी पशुधन चाऱ्यासाठी पावसाळ्यातील चाऱ्यासाठी बेगमी केलेल्या तब्बल सहा मोठ्या गवतगंज्या आगीत जळून खाक झाल्या. ही घटना काल चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथे घडली. या आगीत वर्षभरासाठी साठवलेला चारा जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. या घटनेत प्रकाश वैजू करडे, नारायण वैजू करडे, वैजू कृष्णा भोगण, दशरथ लक्ष्मण भोगण आदी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

       घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. असे असली तरी गवतगंज्या पेटून नुकसान झालेल्या अशा घटनांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय स्तरावरून मदत मिळण्याची अद्याप कोणतीच तरतूद नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर हा अन्यायच आहे. त्यामुळे आगीत गवताच्या गंज्या जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा शासकीय स्तरावरून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. दरम्यान ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला तथापि आगीच्या तीव्रतेपुढे ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे ठरले. त्यामुळे आगीमध्ये सहाही गवतगंज्या जळून खाक झाल्या.

No comments:

Post a Comment