कोवाड येथे ताम्रपर्णी नदीत जॅकवेल जवळ मगरीचे दर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2026

कोवाड येथे ताम्रपर्णी नदीत जॅकवेल जवळ मगरीचे दर्शन


संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी एल वृत्तसेवा दि २४-०१-२०२६

कोवाड येथे ताम्रपर्णी नदी काठावर वारंवार मगरीचे दर्शन होत आहे. आता पुन्हा या मगरीचे दर्शन शुक्रवारी (23 जानेवारी 2026 रोजी) दुपारी तीन वाजता कोवाड येथील जॅकवेल जवळ झाले. या नदीमध्ये मगर स्थिरपणे पाण्यावर थांबली होती. याचे दर्शन दुपारी तीन वाजता गजानन मनगुतकर, सुभाष हुंदळेवाडकर, फिरोज शेख यांना झाले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. कोवाड नदीपत्रामध्ये रोज अनेक जण कपडे धुतात, शेकडो ग्रामस्थ पाण्यात पोहून आंघोळीचा आस्वाद घेतात. मात्र आता जॅकवेल जवळ मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment