चंदगड / सी एल वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, संतोष तेली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिवप्रसाद तेली यांच्या सोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष सौ. मनीषा तेली, मजूर संघाचे संचालक लक्ष्मण तोडकर, मारुती पाटील, शामराव घेज्जी, परशुराम कांबळे, संतोष सारंग, निखिल तेली, रमेश चौगुले, चंद्रकांत हसुरे, कलाप्पा हेबुले, बाळकृष्ण मांग, संजय घस्ती, ऋतिक लोहार, काशिनाथ मस्ती, शंकर स्वामी, बापू कोरी, अप्पू केरुजी, शिवानंद खिचडे, अजिंक्य तोडकर, अनिल तेली, जयप्रकाश साव्यान्नावर, गंगाधर हजारे, सचिन हजारे, दुंडाप्पा लोहार, सुरेश कांबळे, राहुल कांबळे, आण्णाप्पा लोहार, सुरेश तेली यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

No comments:
Post a Comment