माडखोलकर महाविद्यालयात ३० व १ रोजी स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळ्याचा उत्साह, सिने अभिनेते नितीन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2026

माडखोलकर महाविद्यालयात ३० व १ रोजी स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळ्याचा उत्साह, सिने अभिनेते नितीन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती

सिने अभिनेते नितीन कुलकर्णी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री संचलित, र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न होणार आहे. दि. ३० जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि शैक्षणिक यशाचा गौरव केला जाणार आहे.

    कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार, दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता 'फनी गेम्स' आणि 'व्यापारी जत्रा' या उपक्रमाने होईल. मुख्य सोहळा रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता 'गुरुवर्य एस. एन. पाटील बहुउद्देशीय सभागृह' येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खेडूत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जी. एस. पाटील भूषविणार असून, प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेते नितीन कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

    यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सीडीसीचे चेअरमन प्रा. आर. पी. पाटील, ऑडिटर प्रा. ॲड. एन. एस. पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवारच्या सत्रात शेला पागोटे, विद्यार्थी गुणगौरव, अल्पोपहार आणि दुपारी २ वाजल्यापासून विविध गुणदर्शन (सांस्कृतिक कार्यक्रम) अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्यास सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी प्राचार्य प्रा. (डॉ.) एस. डी. गोरल आणि महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment