कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
पारादीप फॉसपेट्स लिमिटेड आणि चंदगड तालुका शेतकरी सह. खरेदी विक्री संघ लि. तुर्केवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 'महा शेतकरी संमेलन'चे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड तालुका शेतकरी संघ दाणेदार खत कारखाना शिनोळी येथे बुधवार दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हे संमेलन होणार आहे.
शेतकऱ्यांना नवीन युग नवीन तंत्रज्ञान जय किसान च्या साथीने, ऊस पिक व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, माती परीक्षण आधी विषयांवर सर्वंकष मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी अनिल चिंचोळकर (जनरल मॅनेजर), कालिदास सावंत (विभागीय व्यवस्थापक पारदीप फॉस्फेट्स), स्वयंप्रकाश चौधरी (जनरल मॅनेजर झुआरी फार्महब), व्हा. चेअरमन तानाजी गडकरी, व्यवस्थापक एस. वाय. पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी जयवंतराव जगताप (ज्येष्ठ शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्र प्रमुख तळसंदे), डॉ. अतुल पवार (एम.एम.एम. ए.ए.आय.सी. लांबोटी) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदगड तालुका शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment