कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
जयप्रकाश विद्यालय किणी (ता. चंदगड) येथील अध्यापक दिलीप शंकर बिर्जे यांच्या शैक्षणिक साधनाचा नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक आला होता. त्यांच्या या साधनाची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. डिजिटल खेळातून संकल्पना दृढीकरण, विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवणे व विद्यार्थी स्वतः कृती करून शिकू शकतात. असे उपकरण त्यांनी बनवले असून एकाच घटकावर वेगवेगळ्या कृतींमुळे संकल्पना दृढ होतात. असे हे बहुउद्देशीय साधन आहे. या उपकरणाची चंदगड तालुक्यात प्रथम क्रमांक त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील आळते येथे झालेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकासाठी निवड निवड झाली होती.
आता २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयात होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी या उपकरणाची निवड झाली आहे. बिर्जे यांनी यापूर्वीही विज्ञान प्रदर्शनातून राज्य स्तरापर्यंत मजल मारली होती. त्यांची राज्यस्तरावर शैक्षणिक साधन निर्मितीसाठी निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. नागपूर येथील विज्ञान प्रदर्शन साठी त्यांना मुख्याध्यापक पी. जे. मोहनगेकर, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व संस्था पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment