![]() |
| कृष्णा मेणसे |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
ज्येष्ठ नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त बेळगाव येथे पुरस्कार वितरण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंदिर, खानापूर रोड, (रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ) बेळगाव येथे मंगळवार दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड भालचंद्र कांगो पत्रकार व साहित्यिक (सदस्य भाकप राष्ट्रीय सचिव मंडळ) तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर कोल्हापूर (मुळगाव किणी, ता. चंदगड) हे उपस्थित राहणार आहेत.
कॉम्रेड कृष्णा मेणसे स्मृती पुरस्काराचे यंदाचे पहिले मानकरी म्हणून आयटक कामगार महासंघाच्या राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड अमरजीत कौर व बेळगावचे कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी बेळगावचे गांधीवादी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष ॲड नागेश सातेरी, दिलीप पवार (कोल्हापूर), प्रसन्न उटगी (मडगाव- गोवा), डॉ. मेधा पुरव- सामंत (पुणे), सचिव - प्रा आनंद मेनसे, कृष्णा शहापूरकर, प्रकाश मरगाळे, शिवाजी देसाई, सौ लता पावशे, अनिल आजगावकर, अशोक कलगोंडी, चंद्रकांत मजुकर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment