महाविद्यालयीन जीवनात.... सर्वगुण संपन्न व्हावे - डॉ. चंद्रकांत पोतदार - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2026

महाविद्यालयीन जीवनात.... सर्वगुण संपन्न व्हावे - डॉ. चंद्रकांत पोतदार

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

      भाषा माध्यम समाजाच्या  उत्कर्षासाठी असते. कोणतीही भाषा कनिष्ठ नसून ती त्या त्या ठिकाणी श्रेष्ठच असते  मराठी भाषेतील साहित्य शारदेतील साहित्यिकांच्या विचार चिंतन  केलं तर आयुष्याला आकार देता येतो. त्यातून प्रेरणा आणि दिशा देणारे विचार मराठी लेखकांच्या लेखणीतून उतरले त्यामुळेच स्वातंत्र्य गीतं, समरगीते, लावणी पोवाडे हे ऐतिहासिक काळाला स्मरण करणारे ठरतात तर संत वचनांमुळे महाराष्ट्र  अध्यात्म आणि धर्म व्यवस्थेला स्वीकारून आहे.

 विद्यार्थ्यांनी  तरुण वयातच स्वतःला  सांभाळता आलं पाहिजे हे वय खूप नाजूक असते या वयातच स्वतःला सावरून  जीवनाचा मार्ग स्वीकारावा,त्यासाठी आई-वडिल  आणि गुरुजनांची संस्कार दिलेले असतात ते आयुष्याला सुखकर करणारे  संस्कार जपून ठेवता आले तर आपण या सृष्टी चक्रातून पुढे पुढे प्रवास करताना ते नक्कीच दिशा देणारे असतात. त्यासाठी महाविद्यालय जीवनात सर्व गुण संपन्न व्हावे  असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रा चंद्रकांत पोतदार कोवाड येथील वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा एम व्ही पाटील होते.

पुढे डॉ. पोतदार म्हणाले, येणाऱ्या आव्हानांचा सामना करत आपले आयुष्य सुंदर करता येते त्यासाठी थोरा मोठ्यांचे विचार अंगीकरावेत.

 डिजिटल युगात यांत्रिकीकरणात माणूस हरवत चालला, असून तो संवेदनशील बनत चालला आहे.  त्यामुळे माणूस माणसापासून लांब होत चाललेला आहे  मनुष्याशी जवळीक, संवाद साधून आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे त्यासाठी साहित्य कला प्रकारांचा आधार घ्यावा आणि त्या ठिकाणी व्यक्त होऊन मनातील सारे कंगोरे व्यक्त करावे.

    विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातच आपल्या जीवनाच्या पाया घट्ट करावा  त्यासाठी अनेक विचारवंतलेखक अभ्यासावेत हे वय जीवन जगण्याचा मार्ग निवडण्याचे एकमेव क्षेत्र आहे या काळात आपण विविध कलागुणांना वाव देत, विचारवंतांचे विचार हे मार्गदर्शक असतात त्यांचे पुनर्वाचन करून त्या विचारांच्या दिशेने आपण वाटचाल करावी आणि आपला जीवन प्रवास करावा यासाठी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील विचारवंतांचे विचार हे नक्कीच आपल्याला मार्गक्रमण करणारे दिशा देणारे ठरतील.छ शिवचरित्र सावित्रीबाई फुले, म फुले, शाहू महाराज, डॉ.आंबेडकर, वि वा शिरवाडकर, रणजित देसाई, वि स.खांडेकर भालचंद्र नेमाडे या  आणि संत साहित्य आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा देणार आहे. बाल वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल आव्हानांचा मुकाबला करत वैश्विक रूप प्राप्त केले.

  प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.मान्यवरांचा स्वागत समारंभ झाला प्राचार्य डॉ. व्ही आर पाटील यांनी प्रास्ताविकात संपूर्ण महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला. पाहुण्यांची ओळख डॉ. आर. डी. कांबळे यांनी केली त्यानंतर विविध विभागांचे अहवाल वाचन करण्यात आले.क्रीडा विभागाचा अहवाल वाचन प्रा. आर टी पाटील  सांस्कृतिक विभागाचा अहवाल डॉ. व्ही के दळवी यांनी सादर केला. अध्यक्ष मनोगतात मा. एम व्ही पाटील यांनी संस्था महाविद्यालयाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन  वेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्या आणि आपल्या महाविद्यालयाचा लौकिक वाढवावा म्हणून आवाहन केले. मा. संजीव पाटील  यांचे मनोगत झाले.

 यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट  एन. एस. पाटील सचिव  एस.  एम. फर्नांडीस खजिनदार गोविंद प्रभू पाटील सर्व संस्थेचे पदाधिकारी संचालक सदस्य आजीव,माजी सदस्य उपस्थित होते

यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत पोतदार यांचा सन्मान मा. एम  व्ही पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

 अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर पाथरवट याचा प्रा. एन एस पाटील यांच्या हस्ते  विशेष सत्कार केला तर प्रा. आर. टी. पाटील प्रा. ए.के. कांबळे यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल  मिळालेल्या पुरस्काराबद्दल मा. एम. व्ही. पाटील प्रा. एन एस पाटील आणि डॉ चंद्रकांत पोतदारं यांच्या हस्ते शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. 

त्यानंतर महाविद्यालयातील सर्व वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये व सांस्कृतिक एनएसीएस आणि विविध उपक्रमांमध्ये यशवंत आणि गुणवंत  विद्यार्थ्यांचे   सन्मान  मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी सर्वोदय या भित्तिपत्रकाचे प्रकाशन मराठी भाषा दिन प्रसंगी डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या हस्ते  प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.

यावेळी किणी कर्यात भागातील शिक्षणप्रेमी, पत्रकार, ग्रामस्थ विद्यार्थी माजी विद्यार्थी संघटना पालक संस्थेचे सर्व हितचिंतक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सेवक कर्मचारी बहुसंख्य उपस्थित होते. आभार डॉ. ए. के. कांबळे यांनी मांडले.

दुपारी कलारंग २०२६ विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यामध्ये वेगवेगळ्या नृत्याविष्काराबरोबरच कलाप्रकारांची सादरीकरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागांचे, समितीचे प्रमुख, सेवक, कर्मचारी आणि प्राध्यापक यांनी घेतला. कलारंग कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

 सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे आणि डॉ. सुनिता कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment