![]() |
| नांदवडे येथे दहावी विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना संस्थेचे ऑडिटर एन. एस. पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नांदवडे (ता. चंदगड) येथील भावेश्वरी विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खेडूत शिक्षण संस्थेचे ऑडिटर एन. एस. पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “मुंगी जशी साखरेचा संग्रह करते तसे तुम्हीही मुंगीप्रमाणे सातत्याने ज्ञानाचा संग्रह करा आणि जीवनात यशस्वी व्हा.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवी उर्मी निर्माण झाली.
![]() |
| नांदवडे येथे दहावी विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभ प्रसंगी बोलताना शालेय समितीचे चेअरमन रामाणा पाटील |
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन रामाणा पाटील होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत प्रामाणिक प्रयत्न व चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. एल. पवार यांनी केले. त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सहशालेय प्रगतीचा आढावा घेत त्यांचे कौतुक केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून डी. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. एस. आर. कोरवी यांनी प्रभावीपणे केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी रचना मळवीकर व स्मितल गावडे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच इयत्ता दहावीच्या संजोग मळवीकर, वेदांत गावडे, आर्या गावडे, सिद्धी गावडे, कार्तिकी पाटील, पल्लवी गावडे, स्नेहल गावडे व दीप्ती गावडे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमा दरम्यान सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, शालेय समिती सदस्य सटूप्पा शिंदे, ॲड. संतोष मळवीकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभाशिर्वाद दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी. एम. कांबळे यांनी मांडले. सदिच्छा, प्रेरणा आणि आठवणींच्या भावनिक वातावरणात हा समारंभ उत्साहात पार पडला.


No comments:
Post a Comment