भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती निमित्त पर्यावरण जागृती व नदी स्वच्छता मोहीम, कलाशक्ती नृत्य संस्थेचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2026

भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती निमित्त पर्यावरण जागृती व नदी स्वच्छता मोहीम, कलाशक्ती नृत्य संस्थेचा उपक्रम

  

नदी स्वच्छता मोहीम वेळी उपस्थित असलेले कुठ्ठाळी येथील नृत्यसंस्थेचे पदाधिकारी व सदस्य

पणजी : सी एल वृत्तसेवा

  गोवा राज्यात अल्पावधीतच आपल्या समाजाभिमुख उपक्रमामुळे नावारूपास आलेली संस्था म्हणजे  कुठ्ठाळी येथील कलाशक्ती नृत्य संस्था.  नृत्य कलेचे धडे देण्याबरोबरच निसर्गाच्या सान्निध्यात राहून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण काय करू शकतो हे देखील उत्तम प्रशिक्षण देणारी पर्यावरणवादी संस्थां आहे.

  संस्थेच्या वतीने १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पर्यायर्णाचा  ऱ्हास टाळण्यासाठी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात संस्थेच्या सांकवाळ, कुठ्ठाळी भागातील गृहिणींनी बालकलाकारांसोबत कौटुंबिक सहलीचे आयोजन केले. बाल वयात पर्यावरण प्रेम बिंबवण्याचा प्रयत्न प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिला. यावेळी पर्यावरणाशी एकरूप होवून आनंद आणि समाधानाची अनुभूती सर्वांना मिळाली. 

  दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील डोंगराळ भागातील ( दुर्गम भागात ) गावडोंगरी सारख्या निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या स्वच्छ भागात प्रवेश करण्यापूर्वी  पर्तगाळ मठासमोरील  पुरुषोत्तम श्री रामाचे दर्शन घेऊनच पाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्यांच्या खाली नदी पात्रात स्वच्छता मोहीम राबवली. नदी व परिसरातील प्लॅस्टिक बाटल्या प्लास्टिक कचरा निरुपयोगी वस्तूंचे संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावत नदीपात्र स्वच्छ केले. तेथून परतताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण केलेल्या कार्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. उपक्रमाचे योग्य नियोजन करण्यात सौ सुप्रिया, सौ स्मिता, सौ वैधवी, सौ छाया, सौ निकम , सौ अनुजा, सौ शिल्पा आई, राजाराम पाटील, परब व  विजय आदींनी पुढाकार घेतला होता. 

No comments:

Post a Comment