चंदगड येथील शिक्षिका पुष्पा सुतार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2026

चंदगड येथील शिक्षिका पुष्पा सुतार यांचे निधन

 

पुष्पा हरीभाऊ सुतार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील पुष्पा हरीभाऊ सुतार (वय 58) यांचे आज पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्या खेडूत शिक्षण मंडळाच्या दि न्यु इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षिका म्हणून गेली ३८ वर्षे कार्यरत होत्या. चंदगड येथील हरीभाऊ रामचंद्र सुतार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आज गुरुवारी (ता. १६) चंदगड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी (ता. १८) रोजी रक्षाविसर्जन होईल.

No comments:

Post a Comment