आमरण उपोषण करणाऱ्या कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्याने शुक्रवारी हलकर्णी फाटा येथे कामगार करणार रास्ता रोको आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2026

आमरण उपोषण करणाऱ्या कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्याने शुक्रवारी हलकर्णी फाटा येथे कामगार करणार रास्ता रोको आंदोलन

चंदगड / प्रतिनिधी 

    दौलत साखर कारखाना कामगारांचे विविध मागण्यासाठी चंदगड तहसिलसमोर आठव्या दिवशीही आमरण उपोषण सुुरु आहे. आठ दिवस होवूनही मागण्या मान्य न झाल्याने कामगारांनी रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे. आमरण उपोषण करणाऱ्या कामगारांच्या मागण्या मान्य न झालेने चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथे शुक्रवारी दि. १० एप्रिल २०२६ रोजी  रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आलेले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, `दौलत कामगार त्यांच्या सहकुटुंबासह दि. १०/०४/२०२६ इ. रोजी सकाळी ११.०० वाजता ठरल्याप्रमाणे चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. दौलत कामगारांचा उपोषणाचा ८ (आठ) दिवस होऊन गेले आहेत. त्यामध्ये शासकीय प्रशासनाने पगार करणे संदर्भात अर्थव प्रशासनावर पगार करावा आणि या उपोषण करणाऱ्या व सर्व कामगांरावरील अन्याय दूर व्हावा अशी कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांवर वाईट वेळ आलेली आहे. त्यांच्या जीवीताला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. सर्व दौलतचे कामगार त्यांच्या सहकुटुंबासह शुक्रवारी दि. १०/०४/२०२६ इ. रोजी तालुक्यातील सर्व सुज्ञ जनतेला सोबत घेऊन सकाळी ठिक ११.०० वाजता रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. तत्पूर्वी दौलत कामागारांचा पगार झालेस सदरचे आंदोलन माघार घेणेत येईल. त्यामुळे होणाऱ्या वाहनांची कोंडी व इतर कोणत्याही घटकावर परिणाम झाल्यास सर्व जबाबदारी शासकीय प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment