चंदगड / प्रतिनिधी
महापुरुष, समाजसुधारक व क्रांतीकारक यांची भव्य दिव्य संयुक्त जयंती जेलुगडे (ता. चंदगड) येथे उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या उद्घाटक सौ. पुष्पा गावडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शशिकांत गावडे होते तर प्रमुख पाहुणे सुहास प्रभाकर शिंदे,पाटणे (PSI गडहिंग्लज) व इतर मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये कृष्णा नाईक (सरपंच जेलुगडे), अनंत कांबळे (सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोरज), देवानंद कांबळे व शंकर देवळी यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल, प्रा. गणपती गावडे, (यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हलकर्णी), यश तुपारे (आयकर विभाग) यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर शैक्षणिक क्षेत्रात सुयश मिळवलेले गुणवंत विद्यार्थी आकांक्षा प्रधान इयत्ता ५ वी, प्रतिक गावडे, नांदवडे, समिक्षा पवार, सलोनी गावडे, स्वरांजली गावडे, दिव्या कोवाडकर, तसेच जय भीम कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ व कोल्हापूरी शब्दसरी बहुउद्देशीय काव्य संस्था जेलुगडे, आयोजित तालुका स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा विजेते प्रथम क्रमांक पियुष पाटील, कडलगे ब्रु. रोख रक्कम ३०००रु. सुहास शिंदे, पाटणे PSI गडहिंग्लज यांच्याकडून द्वितीय क्रमांक आकांक्षा प्रधान, जेलुगडे, रोख रक्कम २०००रु. कृष्णा नाईक यांच्याकडून तर तृतीय क्रमांक श्रद्धा दशरथ पाटील व गौरी कांबळे रोख रक्कम १००० रु. मा. पुंडलिक अर्जुन प्रधान यांच्याकडून देण्यात आले. सर्वच विजेत्यांना ज्ञानेश्वर गावडे व वैभव गावडे (कमांडो) यांच्याकडून सन्मानचिन्ह तसेच विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना मंडळाकडून सन्मानपत्र देण्यात आले. तसेच सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेले परशराम रामू गावडे व अंकुश धोंडिबा प्रधान यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाकडून चार अनाथ मुलींना वह्या पेन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला कृष्णा नाईक (सरपंच जेलुगडे), दत्तात्रय गावडे, उपसरपंच, रेखा गावडे (पो पाटील), सुवर्णा गावडे, वैशाली गावडे, आरती गावडे (ग्रा प सदस्या), अश्विनी गावडे (आशा सेविका), माऊली गावडे, ग्रामसखी, शालन गडकरी, जान्हवी गावडे, शिवाजी गावडे, एकनाथ गावडे, वैजनाथ गावडे, दिपक गावडे, फुलाजी देवळी, परशराम गावडे, नंदकुमार धो. गावडे, गावडू गावडे, भगवंत तुपारे, गुंडू प्रधान, वैष्णवी गावडे तसेच विविध संस्थांचे मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कवी दशरथ पाटील यांनी मानले.

No comments:
Post a Comment