चंदगड : सी एल वृत्तसेवा
शहरातील कॉलेज रोड येथे शनिवारी रात्री व रविवारी सकाळी पिसाळलेल्या दोन भटक्या कुत्र्यांनी दोन शाळकरी विद्यार्थी एक तरुण व एक वर्षाची बालिका अशा पाचजणांवर हल्ला करून जखमी केले. बालिकेवर बेळगाव येथे केएलई दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. आता या बालिकेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.
येथील कॉलेज रोडवर शनिवारी रात्री ९.१५ वाजता पिसाळलेल्या कुत्र्याने आझाद गल्लीतील फारुख बेपारी (१८), झिशान मुल्ला (१३) या दोन बालकांसह तरुण रोहित धुपदाळे (३०) यांच्यावर हल्ला केला तेही तिघांच्याही उजव्या हातालाच चावे घेतले. त्यांच्यावर चंदगड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता दुसऱ्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने घरासमोर खेळत असणाऱ्या एक वर्ष वयाच्या साजिया सलमान बेपारी या
बालिकेच्या कानाजवळ तसेच कपाळावर चावा घेऊन गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे शहर परिसरात संताप व्यक्त होत आहे. नगरपंचायत प्रशासनाने त्वरित अशा भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment