शिप्पूर तर्फ नेसरी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर जिर्णोद्धार सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

11 May 2026

शिप्पूर तर्फ नेसरी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर जिर्णोद्धार सोहळा

 


नेसरी / सी एल वृत्तसेवा

शिप्पूर तर्फ नेसरी ता गडहिंग्लज येथील ग्रामस्थ देणगीदारांच्या सहकार्यातून जवळपास 40 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरांचा जिर्णोद्धार सोहळा मंगळवार दि 12 मे ते गुरवार दि 14 मे 2026 पर्यंत संपन्न होत आहे .

       सुरगीश्वर संस्थान मठ नूलचे मठाधिपती गुरुसिध्देश्वर महास्वामिजी , चंद्रकांत तेजम , अरूण जाधव , सुनिल सोमन भटजी यांच्या हस्ते व उपस्थितीत संपन्न होत आहे . मंगळवार दि 12 रोजी आन्यवरांच्या उपस्थितित मु्तमेढ , देवदेवतांना आवाहन , ग्रामदैवत अभिषेक कळस व मूर्ती मिरवणूक , गणेश पूजन आदि कार्यक्रम संपन्न होणार आहेत . या कार्यक्रमाला खासदार श्रीमंत शाहू महाराज , वैद्यकिय शिक्षणमंत्री हसनसो मुश्रीफ , आमदार सतेज पाटील , माजी आमदार राजेश पाटील , जिप सदस्य संग्राम कुपेकर ,विद्याधर गुरबे , सभापती डॉ सौ प्रतिभा चव्हाण , उपसभापती अमर हिडदुगी सरपंच सचिन गरव, सौ स्नेहल जाधव उपस्थित राहणार आहेत . बुधवार दि 13 मे रोजी होमहवन पुर्णाहूती , मूर्ती प्राणप्रतिष्ठापना , 

कळसारोहन व मंदिर लोकार्पण सोहळा खासदार धनंजय महाडीक , आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर , आमदार शिवाजी पाटील 

आदि मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे . रात्री देवाची आळंदीच्या साध्वी वैष्णवी सरस्वती यांचे किर्तन आहे . सोमवार दि 14 रोजी दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे . दुपारी श्रीमंत शितोळे सरकार अंकलीकर यांच्या अश्वाचा रिंगण सोहळा कामताचे माळ येथे होणार आहे . तर रात्री 9 वाजता महाराष्ट्राची लोकधारा ते सोहळा शिवशाहीचा हा कार्यक्रम होणार आहे .

तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकानी लाभ घेण्याचे आवाहन जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष बाबूराव गुरबे यानी केले आहे


No comments:

Post a Comment