चंदगड तालुक्याचा १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल ९६.१५, ३६ शाळांचा निकाल १०० टक्के - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2026

चंदगड तालुक्याचा १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल ९६.१५, ३६ शाळांचा निकाल १०० टक्के

  

 

तेऊरवाडी (एस. के. पाटील)
    माहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १० वी बोर्ड परीक्षे चा चंदगड तालुक्याचा निकाल ९६.१५ टक्के इतका लागला. तालुक्यातील सर्व माध्यमांच्या मिळून ७५ माध्यमिक शाळापैकी तब्बल ३६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी अत्यंत कडक व CCTV च्या निगरा निखाली  हि परीक्षा झाल्याने काही टक्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचा फुगवटा मात्र घटला आहे. चालू वर्षाही निकाला मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.
    चंदगड तालूक्यातील ७५ माध्यमिक शाळामधून २२०२ विद्यार्थ्यांनी १० वी साठी फॉर्म भरले होते. यापैकी २३९३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली. यामधील २३०१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९६.१५ टक्के इतका निकाल लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्या पैकी ९२० विद्यार्थी विशेष प्राविण्य मध्ये, ८८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४०१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १०० विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

No comments:

Post a Comment