चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघातील काजू उत्पादक शेतकरी, काजू प्रक्रिया उद्योग आणि संपूर्ण तालुक्याच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज प्रत्यक्षात येत आहे.
चंदगड येथे काजू मंडळाचे विभागीय कार्यालय, अत्याधुनिक नर्सरी, काजूसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स, काजू प्रक्रिया प्रकल्प, काजू निर्यात केंद्र, अद्यावत गोदाम आणि काजू बाजार समिती उभारण्याच्या दृष्टीने हलकर्णी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र शासनामार्फत काजू बोर्डाच्या कार्यालयासाठी तब्बल ३६ एकर जागा नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शासन स्तरावरील संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून चंदगडच्या काजू उद्योगाच्या विकासासाठी नवे पर्व सुरू होत आहे.
चंदगड तालुका हा राज्यातील महत्त्वाचा काजू उत्पादक परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र आजपर्यंत काजू संशोधन, प्रक्रिया, साठवणूक, निर्यात आणि बाजारपेठ यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. आता या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उभारल्या जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला दर्जा, योग्य बाजारभाव आणि मूल्यवर्धनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पामुळे –
✅ काजू उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल.
✅ आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित काजू उत्पादनाला चालना मिळेल.
✅ प्रक्रिया उद्योगांना बळ मिळून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
✅ काजू निर्यातीस प्रोत्साहन मिळेल आणि चंदगडची ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मजबूत होईल.
✅ स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल.
चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे काजू उत्पादक शेतकरी, उद्योजक आणि युवकांसाठी विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
या ऐतिहासिक निर्णयासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन तसेच या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या सर्व संबंधित विभागांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

No comments:
Post a Comment