चंदगड-हेरे-तिलारीनगर मार्गावरील धोकादायक विहिरीची प्रशासनाकडून पाहणी - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2026

चंदगड-हेरे-तिलारीनगर मार्गावरील धोकादायक विहिरीची प्रशासनाकडून पाहणी

चंदगड, प्रतिनिधी : 

चंदगड-हेरे-तिलारीनगर मुख्य मार्गावर असलेल्या अत्यंत धोकादायक विहिरीभोवती तातडीने संरक्षक कठडा उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सदर ठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण आणि नगराध्यक्ष सुनिल काणेकर तसेच उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका यांनी नगरपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. यावेळी संबंधित ठिकाणाची सविस्तर तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

या पाहणीदरम्यान निलेश सुतार, अमेय सबनीस, सचिन सातवणेकर, रोहित पिळणकर, विवेक सबनीस, अजय कदम, सुधा नेसरिकर, मुनीर आगा, अनिल पाऊसकर आणि मयूर गावडे यांच्यासह स्थानिक सजग नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धोकादायक विहिरीभोवती लवकरात लवकर संरक्षक कठडा उभारून नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी यावेळी पुन्हा करण्यात आली.

No comments:

Post a Comment