चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात शनिवारी व रविवारपासून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. यामुळे मान्सून सुरू होण्याच्या आशेमुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. सर्वत्र भातरोप लावण साठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज आहे. मात्र अद्याप म्हणावा तितका मोठा पाऊस पडला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. चंदगड तालुक्यातील पूर्व, पश्चिम भागामध्ये सर्वत्र शनिवारपेक्षा रविवारी पावसाच्या हलक्या सरी जास्त प्रमाणात पडल्या त्यामुळे वातावरण मान्सूनमय झाले आहे. सकाळच्या सत्रात काहीसे ढगाळ वातावरण, दुपारी ऊन तर सायंकाळी मात्र पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता.

No comments:
Post a Comment