कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
येथील श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित व्यायामाची गरज आणि निरोगी जीवनशैलीचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्रीडाशिक्षक डी. एम. तेऊरवाडकर यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणेचे महत्त्व समजावून सांगितले.
मुख्याध्यापक व्ही. एन. कांबळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने सादर केली. योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली.“योग हे निरोगी जीवनाचे प्रभावी साधन आहे,” असा संदेश मुख्याध्यापक व्ही. एन. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:
Post a Comment