चंदगड नगरपंचायतीत पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष अभियान व लोककल्याण मेळावा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2026

चंदगड नगरपंचायतीत पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष अभियान व लोककल्याण मेळावा उत्साहात

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड नगरपंचायतीच्या वतीने केंद्र सरकारच्या 'पीएम स्वनिधी' (PM SVANidhi) योजनेअंतर्गत विशेष अभियान आणि लोककल्याण मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    कार्यक्रमाला चंदगड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती शिल्पाराणी जाधव, नगराध्यक्ष सुनील काणेकर आणि उपनगराध्यक्ष सौ. आयेशा नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी नगरपंचायतीतील सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    मेळाव्यात पीएम स्वनिधी योजनेची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली. या योजनेद्वारे लघु व फेरीवाले व्यावसायिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांचा व्यवसाय अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. तसेच विविध शासकीय लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

    कार्यक्रमास शहरातील नागरिक, महिला, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक व सामाजिक प्रगती साधण्याचे आवाहन केले.

1 comment:

Changad Farmers Against Corruption said...

चंदगड कोल्हापूर प्रशासनात भ्रष्टाचाराचा उच्चांक! असहाय्य गरीब दिनदुबळ्या अन्नदात्या रयतेची लुट! भाजपा सरकारचा भ्रष्टाचाराला संपूर्ण पाठिंबा!!

आज कुणबी समाज, भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी खोटे दस्त बनवून कुणबी समाजाच्या शेतजमिनी लुबाडत असल्याने हवालदिल झाला आहे.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्यात रयतेची लूटमारी, भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र भाजपा सरकारचे संरक्षण!

"सतत तीन वर्षे केंद्रातर्फे पुरस्कारीत, भ्रष्टाचारात अव्वल क्रमांक पटकावणारे भारतातील एकमेव राज्य - महाराष्ट्र!"

महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन!

हेच ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य! लोकमान्य टिळक, डॉ आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राज्य! आज तेच राज्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्याला कुणीही वाली उरला नाही.

"आमच्या अधिकाऱ्यांनी फक्त दिड लाख शेतकरी कुंटुंबांच्या जमिनी हडपल्या आहेत!" असे महसुलमंत्री मान्य करतात. पण एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी एवढी मोठी बोंब का?

खोटे दस्त बनवून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे प्रकार होत असल्याने शेतकरी हैरान आणि हताश झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने भ्रष्ट्राचार करणे न्यू नॉर्मल ठरवले आहे कि काय असे वाटू लागले आहे. दिड - दोन वर्षांपासून आम्ही चंदगड, गडहिंग्लज या कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील खोटे दस्त बनवून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे स्कॅम रॅकेट मुख्यमंत्री ते महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांना अवगत करून देत आहोत. पण परिणाम शून्य!! अशी दुर्दशा झाली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज्यांच्या रयतेच्या राज्याची!!! मुळात मुख्यमंत्री भ्रष्ट्राचार हा गुन्हाच समजत नाहीत! पाहाः See the proofs of corruption in Chandgad, Gadhinglaj, Kolhapur:
https://sites.google.com/view/maha-farmers-agnst-corruption/forged-docs

Post a Comment