कुरणी -बुझवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला भातरोप लागणीचा आनंद, विद्यार्थ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2026

कुरणी -बुझवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला भातरोप लागणीचा आनंद, विद्यार्थ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

 

भातरोप लागण करताना श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी बुझवडेचे विद्यार्थी

चंदगड / प्रतिनिधी

    शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी शाळा नसते तर ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी अहोरात्र झटत   असते. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थांना प्रत्यक्ष शाळेजवळील शेतातील चिखलात उतरून भातरोप लावणीचा अनुभव श्री शरदचंद्रजी हायस्कूल कुरणी बुझवडेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतला. भातरोप लावणीचा एक वेगळाच अनुभव घेताना शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधता आल्याने विद्यार्थ्यांही खूश झाले.

    सध्या चंदगड तालूक्यात पावसाला सुरुवात झाली असल्याने कोकण भागात भातरोप लागण केली जात आहे. याच संधीचा लाभ घेत शरदचंद्रजी हायस्कूल च्या विद्यार्थी, विद्यार्थिनिनी व शिक्षक यानी शालेय अध्यापनाच्या कामकाजातून बाहेर येत थेट विद्यार्थ्यांना शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी चिखल केलेल्या शेतात उतरले विद्यार्थिनीनी भाताचे तरू कसे काढावे, तरू काढताना कुरूडग्यावर कसे बसावे, भात तरुच्या पेंढ्या कशा बांधाव्यात, त्या शेतामध्ये कशा टाकाव्यात अन प्रत्यक्ष तरू लागण कशी करावी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तर इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी सोनल नेवगे हिने शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

    तस पाहिले तर सध्याचे विद्यार्थी या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. पण श्री शरदचंद्रजी हायस्कूलचे विद्यार्थी या सर्वात पारंगत आहेत. विद्यार्थ्यांनी खूपच आनंदाने हा भात रोप लावणिचा अनुभव घेतला. वरून झिमझिम पडणाऱ्या पावसात अन पायाखाली मऊशार असणाऱ्या चिखलात रोप लावताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

    विविध उपक्रम राबवण्या मध्ये श्री शरदचंद्रजी हायस्कूलचा हातखंडा आहे. यापूर्वीही वनविभाग व आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी रोशन कुंभार यांच्या साह्याने सर्प ज्ञान, निसर्ग ज्ञान, वृक्षारोपन करून त्यांचे संगोपन, रस्यांकडेला वाढलेल्या झुडपांची साफसफाई आदि उपक्रम राबवले आहेत. या भातरोप  लागण उपक्रमात मुख्याध्यापक एस. के. हरेर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. पाटील, टि. बी. गावडे, एस. एच. पाटील, जी. बी. मासरणकर, रवि गिलबीले यांच्यासह विद्यार्थानी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment