![]() |
| कुदनूर : योग प्रशिक्षण शिबिरात सहभागी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी जेसीओ सतीश अशोक सुरूतकर, वेलनेस कोच मनिषा सतीश सुरूतकर व रसिका राजीव पाटील व अन्य मान्यवर. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कुदनूर येथे हायस्कूल व मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक २१ जून २०२६ रोजी योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वेलनेस कोच मनिषा सतीश सुरूतकर (माणगाव) व रसिका राजीव पाटील (शिवणगे) यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखवली.
या कार्यक्रमास केंद्र मुख्याध्यापक मोदगेकर, तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गुंडकल उपस्थित होते. तसेच क्रीडा शिक्षक आर. पी. पाटील, निवगीरे, एस. एम. कांबळे, टी. आर. कांबळे, एन. ए. पाटील, प्रमिला कुंभार, भातकांडे,राजू डोणकरी, देवानंद पाटील व विठोबा पाटील तसेच शिपाई संतोष चौगुले यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. योग प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यानंतर सैन्य दलाचे ज्युनियर कॅडेट ऑफिसर सतीश अशोक सुरूतकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या व पेन यांचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.


No comments:
Post a Comment