चंदगडमध्ये महाराष्ट्र राज्य काजू मंडळासाठी ३६ एकर जागा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडून सदिच्छा भेट - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2026

चंदगडमध्ये महाराष्ट्र राज्य काजू मंडळासाठी ३६ एकर जागा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडून सदिच्छा भेट

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या कार्यालयासाठी नाममात्र शुल्क आकारून तब्बल ३६ एकर जागा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांची चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील समस्त काजू उत्पादक शेतकरी, उद्योजक आणि नागरिकांच्या वतीने  आमदार श्री. पाटील यांनी उदय सामंत यांचे आभार व्यक्त केले.

    या ३६ एकर जागेवर महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय, अत्याधुनिक काजू प्रक्रिया सुविधा, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोदामे तसेच काजू उद्योगाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला नवी दिशा मिळणार असून हजारो काजू उत्पादक शेतकरी, उद्योजक आणि स्थानिक युवकांना रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

हा निर्णय चंदगडच्या कृषी व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून काजू उत्पादन, प्रक्रिया आणि विपणनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून भविष्यातही मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकल्पांसाठी प्रयत्न कायम राहतील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

1 comment:

Changad Farmers Against Corruption said...

चंदगड कोल्हापूर प्रशासनात भ्रष्टाचाराचा उच्चांक! असहाय्य गरीब दिनदुबळ्या अन्नदात्या रयतेची लुट! भाजपा सरकारचा भ्रष्टाचाराला संपूर्ण पाठिंबा!!

आज कुणबी समाज, भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी खोटे दस्त बनवून कुणबी समाजाच्या शेतजमिनी लुबाडत असल्याने हवालदिल झाला आहे.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्यात रयतेची लूटमारी, भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र भाजपा सरकारचे संरक्षण!

"सतत तीन वर्षे केंद्रातर्फे पुरस्कारीत, भ्रष्टाचारात अव्वल क्रमांक पटकावणारे भारतातील एकमेव राज्य - महाराष्ट्र!"

महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन!

हेच ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य! लोकमान्य टिळक, डॉ आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राज्य! आज तेच राज्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्याला कुणीही वाली उरला नाही.

"आमच्या अधिकाऱ्यांनी फक्त दिड लाख शेतकरी कुंटुंबांच्या जमिनी हडपल्या आहेत!" असे महसुलमंत्री मान्य करतात. पण एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी एवढी मोठी बोंब का?

खोटे दस्त बनवून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे प्रकार होत असल्याने शेतकरी हैरान आणि हताश झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने भ्रष्ट्राचार करणे न्यू नॉर्मल ठरवले आहे कि काय असे वाटू लागले आहे. दिड - दोन वर्षांपासून आम्ही चंदगड, गडहिंग्लज या कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील खोटे दस्त बनवून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे स्कॅम रॅकेट मुख्यमंत्री ते महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांना अवगत करून देत आहोत. पण परिणाम शून्य!! अशी दुर्दशा झाली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज्यांच्या रयतेच्या राज्याची!!! मुळात मुख्यमंत्री भ्रष्ट्राचार हा गुन्हाच समजत नाहीत! पाहाः See the proofs of corruption in Chandgad, Gadhinglaj, Kolhapur:
https://sites.google.com/view/maha-farmers-agnst-corruption/forged-docs

Post a Comment