चंदगड : सी एल वृत्तसेवा
हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक भागीरथी जयवंतराव देसाई (वय 100) यांचे शनिवारी दिनांक 4 जुलै 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त ऑननरी कॅप्टन राजाराम देसाई व निवृत्त सुभेदार मेजर रवींद्र देसाई यांच्या त्या मातोश्री, तर चंदगड येथील बालरोगतज्ञ डॉ. विवेक देसाई, कोवाड येथील राजश्री शेती सेवा केंद्राचे संचालक विनायक देसाई यांच्या त्या आजी होत. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. ६) सकाळी होणार आहे.

No comments:
Post a Comment