चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी नारायण सटूप्पा जाधव (वय ७०) यांचे शनिवारी (दि. ४) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड येथील रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी नारायण गोजगेकर (रा. मुरकुटेवाडी) यांचे ते सासरे तर निवृत्त मुख्याध्यापक भरमू तारिहाळकर (कागणी) यांचे ते भावोजी होत. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. ६) रोजी सकाळी ८.३० वाजता होणार आहे.

No comments:
Post a Comment