![]() |
| अध्यक्षपदी निवडीबद्दल सुधाकर पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
विद्या मंदिर जेलुगडे (ता. चंदगड) शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर बांदिवडेकर तर उपाध्यक्षपदी शितल गणपती गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच कृष्णा नाईक, माजी अध्यक्ष वसंत गावडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेट्ये, श्री. काटे, समितीचे सर्व सदस्य, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी अध्यक्ष वसंत गावडे यांनी मागील दोन वर्षांच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा आणि केलेल्या कामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. तसेच नूतन सदस्य महादेव गावडे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी अधिक लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी जी. जे. काटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment