खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री संचलित र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड यांच्या वतीने महाविद्यालयाचा २९ वा वर्धापन दिन, नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता के. गुरुवर्य एम. एन. पाटील बहुउद्देशीय सभागृह, चंदगड येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जी. एस. पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी रोहयो राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील उपस्थित राहतील. तर माजी तहसीलदार अधिकारी व करिअर मार्गदर्शक एकनाथ पाटील (तात्या) हे प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी खेडूत शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळातील मान्यवर, विविध शिक्षण संस्थांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयीन जीवनासाठी प्रेरणा देणे तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment