![]() |
| कुरणी-बुझवडे येथील माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन करताना तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
सध्या प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे जागतिक जीवघेण्या स्पर्धेत आपल्याला टिकून रहायचे असेल तर अभ्यास हाच एकमेव पर्याय आहे.
अभ्यासातील सातत्य हाच खरा यशाचा मंत्र असल्याचे मनोगत चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यानी केले.
श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी बुझवडे (ता. चंदगड) येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित वैद्यकिय तपासणी व मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. सोमजाळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. के. हरेर होते.
प्रारंभी येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. सोमजाळ आणि त्यांच्या सोबत असलेल्या वैद्यकिय पथकाने आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले यानंतर वैद्यकिय अधिकारी डॉ. सोमजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, "चांगले आरोग्य हिच आपली खरी संपत्ती आहे. रोजच्या दिनक्रमात स्वच्छतेचा मुलमंत्र पाळणे अंत्यत महत्वाचे आहे. स्वच्छ राहून योग्य आहार घेतल्यात सर्व आजारापासून दूर राहता येते. याबरोबरच परिस्थितीचा बाऊ न करता संघर्ष करत प्रामाणिक पणे अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. यासाठी विद्यार्थ्यानी प्रामाणिक पणे अभ्यास करण्याचा मूलमंत्र डॉ. सोमजाळ यानी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी अडकूर पीएचसीचे एसआय टी. जे. क्षिरसागर, रविंद्र पाटील, एमएसआय एस. कांबळे, इब्राहिमपूर केंद्राच्या एमपीडब्लू आर. आर. शिंदे, एएनएम एल. ए. घोळसे, एमपीडब्लू एस. एस. कानडे या वैद्यकिय पथकाबरोबर एस. के. पाटील, एस. एच. पाटील, जी. बी. मासरणकर, रवि गिलबिले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक एस. के. हरेर यांनी केले. प्रास्ताविक टी. बी. गावडे यांनी केले. तर आभार कु. सोनल नेवगे हिने मानले.

No comments:
Post a Comment