चंदगड / प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांना बालवयातच छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजावा, तसेच त्यांच्या संघर्षाची आणि शूर मावळ्यांच्या पराक्रमाची माहिती मिळावी, या उद्देशाने शिवव्याख्याते रजत हुलजी यांनी कोदाळी येथील शाळेला शिवचरित्रावरील पुस्तके भेट दिली.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवचरित्र तसेच शूर वीर मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारी विविध पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिवाजी महाराजांच्या शौर्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचे वाचन करून महाराजांच्या विचारांचा आदर्श घ्यावा आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळवावी, असे आवाहनही रजत हुलजी यांनी यावेळी केले.प्रास्ताविक सहाय्य्क शिक्षक महेश ढोले यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी अंकुश गावडे, विठ्ठल गावडे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निलेश गावडे, वैष्णवी कांबळे, संदीप कांबळे, संतोष दळवी अनंत कांबळे, श्रीपत कांबळे, रोहिणी गावडे, प्रतीक्षा गावडे, मनोहर गावडे, वामन गावडे, अंकुश गावडे, भगवान गावडे, संदीप सोमा गावडे, दत्ताराम गावडे, लक्ष्मण गवस, चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते. आभार मुक्याध्यापिका सागरिका कुटे यांनी मानले.

No comments:
Post a Comment