चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी मिळणार तब्बल ४५ नवीन बसेस! आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या धडाकेबाज पाठपुराव्याला मोठे यश! - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2026

चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी मिळणार तब्बल ४५ नवीन बसेस! आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या धडाकेबाज पाठपुराव्याला मोठे यश!

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    आमदार  शिवाजीराव पाटील (भाऊ) यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने व प्रभावीपणे केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून चंदगड, गडहिंग्लज व आजरा या तीनही एस.टी. बस डेपोच्या बळकटीकरणासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

    या निर्णयानुसार चंदगड, गडहिंग्लज व आजरा बस डेपोला प्रत्येकी १० नवीन साध्या एस.टी. बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय 'राजमाता जिजाऊ बस' योजनेअंतर्गत प्रत्येक डेपोसाठी प्रत्येकी ५ आधुनिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

    यामुळे या तीनही तालुक्यांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून बसांची कमतरता, फेऱ्यांमध्ये होणारा विलंब आणि जुन्या बसांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

    चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार परिवहन सेवा मिळावी, यासाठी आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत असून त्यातून एकामागून एक विकासकामांना गती मिळत आहे. हा निर्णय देखील त्याच प्रयत्नांचे फलित आहे.

    या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मनःपूर्वक आभार. जनतेच्या सेवेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न... विकासासाठी ठाम पाठपुरावा... हाच आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या कार्याचा विश्वास!

No comments:

Post a Comment