चंदगड : मॉडर्न कॉम्प्युटर्समध्ये एमकेसीएलचा रौप्य महोत्सव सांगता समारंभ उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2026

चंदगड : मॉडर्न कॉम्प्युटर्समध्ये एमकेसीएलचा रौप्य महोत्सव सांगता समारंभ उत्साहात

मॉडर्न कॉम्प्युटर्सचे संचालक संजय कुंभार माहिती देताना, व्यासपीठावर नगराध्यक्ष सुनिल काणेकर, उपनगराध्यक्षा सौ. आयेशा नाईकवाडी 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) पुणे यांच्या २५ व्या वर्धापन दिनाचा सांगता समारंभाचा कार्यक्रम मॉडर्न कॉम्प्युटर्स चंदगड येथे उत्साहात पार पडला.

    कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्य़क्ष सुनील काणेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्षा सौ. आयेशा नाईकवाडी होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॉडर्न कॉम्प्युटर्सचे संचालक संजय कुंभार यांनी केले. त्यानंतर एमकेसीएलच्या मुंबईत पार पडलेला सांगता समारंभाचा कार्यक्रम ऑनलाईन वेबकास्टच्या माध्यमातून सर्वांना दाखवण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपनगराध्यक्षा आयेशा नाईकवाडी यांनीही शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाला नगरसेविका सौ. सुचिता कुंभार व नगरसेवक सचिन सातवणेकर प्रमुख उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास आजी व माजी विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दत्तराज कुंभार यांनी केले. शेवटी संस्थेच्या शिक्षिका कु. ईशा रजपूत यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment