कागल / सी. एल. वृत्तसेवा
कागल - कोल्हापूर येथील राजे विक्रमसिंहजी घाटगे प्रतिष्ठान फौंडेशनचा प्रतिष्ठेचा सन - २०२६ चा 'राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार' रामपूरचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागिलगे (ता. चंदगड) शाळेचे अद्यापक बाबुराव वरपे यांना फौंडेशनचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केला.
बाबुराव वरपे यांच्या बत्तीस वर्षे सेवा काळात विद्यार्थी व समाजातील गरीब, वंचित समाजाची अनेक मुले, विद्यार्थी उच्चशिक्षित करुन, भटक्या समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात उल्लेखनिय योगदान दिले आहे. ज्या समाजातून आपण घडलो, त्या समाजाला आपण कांहीतरी देणे लागतो, याची सदैव जाणिव ठेवून आपण शिक्षण व समाज यांसाठी झिजलात याचा आम्हांला रास्त अभिमान आहे. केवळ आपल्या अप्रतिम कार्याची दखल घेवून सदर पुरस्कार आपणांस देणेस विशेष आनंद होत असलेचे फौंडेशनचे अध्यक्ष तथा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी निवड पत्रात म्हटले आहे.
यापूर्वीही बाबुराव वरपे यांच्या उल्लेखनिय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून जिल्हा ते राज्य, राष्ट्रीय पातळीवरील छत्तीसपेक्षा अधिक पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. वरपे यांच्या उल्लेखनीय कार्यात पत्नी शारदा वरपे व मुले कुमार साहील व कुमारी सायली वरपे यांचे सहकार्य मोलाचे आहे. बाबुराव वरपे यांना प्रतिष्ठेचा सन - २०२६ चा 'राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर झाला आहे.

No comments:
Post a Comment