सातवणे येथे ७० लाखांच्या विकासकामांना प्रारंभ, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते श्री देव रवळनाथ मंदिर सभागृहाचे भूमिपूजन - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2026

सातवणे येथे ७० लाखांच्या विकासकामांना प्रारंभ, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते श्री देव रवळनाथ मंदिर सभागृहाचे भूमिपूजन



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा : 

    सातवणे (ता. चंदगड) येथे श्री देव रवळनाथ मंदिर सभागृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी (दि. ८) चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी गावातील विविध विकासकामांसाठी तब्बल ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती देण्यात आली.

    मौजे सातवणे येथे श्री देव रवळनाथ मंदिर सभागृहासाठी ५० लाख रुपये, दलित वस्तीतील रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख रुपये, देव चव्हाटा परिसर सुशोभीकरणासाठी ५ लाख रुपये (जिल्हा परिषद निधी), तसेच ग्रामपंचायत परिसर सुशोभीकरणासाठी ५ लाख रुपये (पंचायत समिती निधी) असा एकूण ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

    भूमिपूजन सोहळ्यास माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, भारतीय जनता पार्टी सेवा उद्योग समितीचे महाराष्ट्र राज्य संयोजक लक्ष्मण विश्राम गावडे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अडकूर मतदारसंघाच्या सदस्या राजश्री लक्ष्मण गावडे, पंचायत समिती सदस्य रविंद्र बांदिवडेकर, माजी पंचायत समिती सभापती शांताराम बापू, चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा श्रीलक्ष्मी (भारती) जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

    चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, नगरसेवक अमेय सबनीस, मोहन परब, महादेव वांद्रे यांच्यासह पदाधिकारी व नेतेमंडळी उपस्थित होती.

    यावेळी सातवणे गावचे सरपंच विठ्ठल कांबळे, जानबा पारसे, गोविंद सावंत, पांडुरंग पारसे, बाळू गावडे, वसंत माने, प्रकाश रेडेकर, पांडुरंग भडगावकर, संदीप माने, जॉन डिसोझा, प्रमोद निकम, किशोर पाटील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

    श्री देव रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात येणारे नवीन सभागृह गावातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या सभागृहामुळे ग्रामस्थांना विविध कार्यक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध होणार असून, गावाच्या विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातवणे ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment