चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
आंबेवाडी (ता. चंदगड) येथे कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्री कलगुडी देवी युवाशक्ती मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त बुधवारी (दि. ११ नोव्हेंबर २०२६) रोजी भव्य खुल्या नृत्य स्पर्धा आयोजित केल्याची माहिती मंडळाचे प्रवर्तक संदीप गोरल यांनी दिली.
सदर स्पर्धा रात्री ८ वाजता आंबेवाडी येथे मुख्य गल्लीमध्ये होणार आहे. स्पर्धा उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर माने, माजी सभापती शांताराम पाटील, माजी सरपंच अशोक कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती आहे. विजेत्यांना १० हजार रुपये, ७ हजार रुपये, ५ हजार रुपये तर गावमर्यादित गटासाठी १५०१, १००१, ७०१ असी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच सर्व विजेत्यांना कै. संपत राजबा सुभेदार यांच्या स्मरणार्थ शंकर सुभेदार यांच्याकडून चषक देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी संदीप गोरल (9405154072), संदीप गुरव (7057562017), उमेश कडलगेकर (9403741716) जानबा गावडे (7507693494) यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन विजय गुडवळेकर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment