प्रकल्पांचे काम होईपर्यंत गुणनियंत्रक कार्यालय अन्यत्र हलवू नये - आमदार कुपेकर यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2018

प्रकल्पांचे काम होईपर्यंत गुणनियंत्रक कार्यालय अन्यत्र हलवू नये - आमदार कुपेकर यांची मागणी


गडहिंग्लज उपविभागातील सुरु असलेले व पुर्ण नसलेले आंबेओहोळ, उचंगी व सर्फनाला मध्यम प्रकल्प अद्याप पुर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे गुणनियंत्रण उपविभाग गडहिंग्लज मुख्यालय चंदगड हे कार्यालय हे तिन्ही प्रकल्प पुर्ण होईपर्यंत अन्यत्र हलवू नये अशी मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी अधिक्षक अभियंता गुणनियंत्रक मंडळ पुणे यांच्याकडे केली आहे. चंदगड विधानसभा मतदार संघातील गुणनियंत्रण उपविभाग गडहिंग्लज मुख्यालय चंदगड हे कार्यालय कार्यरत आहे. उपविभाग नजीकच्या काळात अन्यत्र स्थलांतरीत होणार असल्याचे समजते. परंतु या उपविभागामुळे या परिसरातील सर्व पाटबंधारे प्रकल्प पुर्ण होण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी हा उपविभाग या ठिकाणीच असणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार कुपेकर यांनी अधिक्षक अभियंता गुणनियंत्रक मंडळ पुणे यांच्याकडे केली आहे.