चंदगड भाजपाच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2018

चंदगड भाजपाच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी


चंदगड येथील भाजपा कार्यालयात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करताना भाजपचे कार्यकर्ते. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका भाजपच्या वतीने भाजपच्या तालुका कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्री. पाटील यांनी अटलबिहारी वाटपेयी यांच्या जीवनपट उलगडला.
चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयातही अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती पार पडला. यावेळी सुधीर देशपांडे यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन केला. यावेळी युवा सरचिटणीस राजू पाटील, चंदगड शहराध्यक्ष योगेश कुडतरकर, तालुका उपाध्यक्ष अंकुश गवस, बाबुराव पाटील, चंदगडमधील भाजपचे जुने कार्यकर्ते चंद्रकांत दाणी, सुधीर देशपांडे, वसंत पास्टे, रविंद्र कसबल्ले, गुंडू ओऊळकर, गुंडू सबनीस यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामीण रुग्णांलयातील रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाला. हेरे येथेही अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरा करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात नांदवडे, शिप्पूर, हेरे, गुडवळे, सावर्डे, खालसा कोळींद्रे, खामदळे येथील नागरीकांच्यासह विनायक हेरेकर, शिवकुमार प्रसादे, शिवाजी पवार, अंकुश गवस, बाबुराव पाटील, अर्जून कदम, मधुकर सडेकर कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा विस्तारक शिवाजी बुवा, चंदगड तालुका विस्तारक संदिप नाथबुवा प्रमुख उपस्थित होते.


No comments:

Post a Comment