सुनिल कोंडुसकर |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी
सुनील कोंडुसकर यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारीता
पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी सायंकाळी पत्रकार
परिषदेत ही घोषणा करण्यात आली. श्री. कोंडुसकर गेली अठरा वर्षे पत्रकारीतेच्या
क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारीतेच्या कारकिर्दीत अनेक सामाजिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक यासह अन्य वेगवेगळ्या विषयावर लिखान केल आहे. त्यांच्या निर्भिड
आणि सडेतोड लिखानामुळे अनेक जटील प्रश्न मार्गी लागले आहेत. त्याच्या या कार्याची
दखल घेवून जिल्हा परिषदेने त्यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर केला आहे. यापूर्वी
त्यांना श्रमिक पत्रकार संघ गडहिंग्लजचा कै. बाबासाहेब कुपेकर स्मृती
पत्रकारीता पुरस्कार, त्रिवेणी सांस्कृतिक संस्था उतूर यांचा उत्कृष्ट पत्रकार
पुरस्कार व साप्ताहिक कोल्हापूर एक्स्प्रेस यांचा चंदगड भूषण पुरस्कार मिळालेा आहे.
1 comment:
आपल्या कार्याची ही पोचपावती आहे. पुढील कार्यास शुभेच्छा
Post a Comment