नागवे (ता. चंदगड) येथे शिवसेनेच्या युवा शाखेचे उद्घाटन करताना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांंडेकर, पिनु पाटील व इतर शिवसैनिक |
चंदगड / प्रतिनिधी
नागवे (ता. चंदगड) येथे शिवसेना
युवासेना शाखेचे उद्घाटन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते
झाले. यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री. खांडेकर म्हणाले, ``शिवसेना 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करते. याप्रमाणे गावातील व या परिसरातील सर्व जनतेच्या समस्यांना
वाचा फोडण्याचे काम या शाखे मार्फत होऊन येणाऱ्या लोकसभा व विधानसभेवर भगवा
फडकवण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन केले.`` यावेळी युवासेना तालुका प्रमुख प्रताप उर्फ पिनु पाटील, युवासेना चंदगड तालुका समन्वयक शरद गावडे, कामगार सेना तालुका प्रमुख कलाप्पा निवगीरे, युवासेना उपतालुका प्रमुख गणेश बागडी, युवासेना शहर प्रमूख सतीश तेजम, युवासेना शहर प्रमुख अझरभाई बुखारी यांच्यासह नागवे गावातील
शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment