तुर्केवाडी सोपानदेव पुण्यतिथी उत्सवाला रविवारपासून प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2018

तुर्केवाडी सोपानदेव पुण्यतिथी उत्सवाला रविवारपासून प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


मजरे कार्वे / प्रतिनिधी  
तुर्केवाडी येथील 97 व्या सोपान देव पुण्यतिथी उत्सवास रविवार दिनांक 30 डिसेंबर 2018 पासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त 30 डिसेंबर पासून 5 जानेवारी 2019 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  येथील ह भ प तुकाराम पाटील व ह-भ-प सुरेश गावडे यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा संपन्न होणार असून विविध मान्यवरांचे प्रवचन, कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 30 डिसेंबर 2018 रोजी सकाळी चार वाजता काकडा आरतीने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. सकाळी 6 वाजता गावातील महिलांची पंचारती सह उपस्थिती असणार आहे. सकाळी 7:30 वाजता दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, ग्रंथपूजन, व्यासपीठ पूजन ध्वज पूजनाने हा सोहळा सुरू होणार आहे. दररोज सकाळी 7 ते 11 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. दररोज सायंकाळी 5 वाजता हरिपाठ होणार आहे. रविवार 30 रोजी सायंकाळी 6.30 वाजता ह भ प कृष्णा गावडे - जंगमहट्टी यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता ह भ प दत्तू वाईंगडे -गुडेवाडी यांचे निरूपण, सोमवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता ह भ प पांडुरंग दळवी- माडवळे यांचे प्रवचन व रात्री 9 वाजता ह भ प एकनाथ उपलानी -अवचितवाडी यांचे निरूपण, मंगळवार दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी 6.30 वाजता ह भ प निवृत्ती मुचंडीकर- कल्लेहोल यांचे प्रवचन रात्री 9 वाजता ह भ प तुकाराम पवार -धारवाडकर -कोल्हापूर यांचे निरूपण बुधवार दिनांक 2 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता ह भ प एम पी पाटील -कावणेकर यांचे प्रवचन व रात्री 9 वाजता ह भ प आकूर महाराज साखरे यांचे निरूपण, गुरुवार दिनांक 3 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता ह भ प पूर्णानंद काजवे- कोगनोळी यांचे प्रवचन व रात्री 9 वाजता ह-भ-प कान्होबा महाराज देहूकर -पंढरपूर यांचे निरूपण शुक्रवार दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता ह भ प राजेंद्र काटे -आळंदी यांचे प्रवचन रात्री 9 वाजता ह भ प रामभाऊ साहेबराव झीजूलकर -अहमदनगर यांचे निरूपण होणार आहे. शनिवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 वाजता ह भ प रामभाऊ झीजूलकर यांचे काला कीर्तन होणार आहे. दुपारी 12 वाजले पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत दिंडी व मंगल कलश मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. तरी या उत्सवाला वारकरी भाविक भक्तांनी उपस्थित रहावे,  असे आवाहन सोपानदेव पुण्यतिथी उत्सव समितीने केले आहे.


No comments:

Post a Comment