संग्रहित छायाचित्र |
चंदगड /
प्रतिनिधी
इसापूर
(ता. चंदगड) येथील गट नं. 1 मध्ये सुरेश नारायण गवस (रा. इसापूर) यांनी 11 जनावरे
चरण्यासाठी सोडली होती. त्यातील सुरेश गवस यांची एक म्हैस वाघसदृश्य प्राण्याने
फस्त केल्याने जाधव यांचे अंदाजे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी
सायंकाळी चार ते आज सकाळी अकराच्या दरम्यान हि घटना घडली.
यासंदर्भात
माहीती अशी – सुरेश गवस यांनी बुधवारी (ता. 9) आपली 11 जनावरे चारण्यासाठी सोडली
होती. मात्र सायंकाळी त्यातील 10 जनावरे परत घरी आली. एक म्हैस परत आली नाही.
त्यामुळे त्यांनी म्हैशीचा शोधा-शोध केला. मात्र अंधार झाल्याने म्हैस मिळून न
आल्याने त्यांनी शोधमोहिम थांबवली. गुरुवारी (ता. 10) सकाळी शोध सुरु केल्यानंतर मालकीतील
झाडाझुडपात सुरेश गवस यांची म्हैस अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आली. याची
माहीती सरपंच स्वप्नाली गवस यांनी वनविभागाला दिली. यावेळी वनविभागाचे वनरक्षक एच.
एस. काळवेल व वनसेवक शंकर गावडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून पाहणी करुन
पंचनामा केला. सरकारी नियमाप्रमाणे जी नुकसान भरपाई होईल ते देण्यासाठी वनविभाग
प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
इसापूर परिसरात
पंधरा-वीस दिवसापूर्वी अस्वलांचा वावर होता. त्यातच आता वाघसदृश्य प्राण्याच्या
अस्तित्व असल्याने लोकांच्यामधून भितीचे वातावरण आहे. लोकांना घराबाहेर पडणे
जिकीरीचे बनले आहे. नागरीकांनी कोणीही एकट्याने घराबाहेर पडू नये असे आवाहन
वनविभागाच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment