चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी पुलवामा हल्याचा निषेध, शहिदांना श्रध्दांजली, चंदगड व कोवाड बंदचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2019

चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी पुलवामा हल्याचा निषेध, शहिदांना श्रध्दांजली, चंदगड व कोवाड बंदचे आवाहन

शिनोळी (ता. चंदगड) येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला व पाकिस्तान  मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. 
चंदगड / प्रतिनिधी
काश्मीरमधील  पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्लाचा चंदगड तालुक्यातील विविध संघटनांनी तीव्र शब्दांत  निषेध केला. यावेळी शहिद जवान अमर रहे, भारत माता की जय व पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत फेरी काढून निषेध नोंदविण्यात आला.  
चंदगड शहरातून काढण्यात आलेली निषेध फेरी.
                                                                     चंदगड
चंदगड येथील युवकांच्या वतीने संभाजी चौक येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्लाचा निषेध करुन बाजार पेठेतून प्रभातफेरी काढण्यात आली. या दहशतवादी भ्याड हल्याच्या निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी (ता. 16) चंदगड बंद ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी काढलेल्या फेरीमध्ये सचिन सातवणेकर, शांताराम हजगुळकर, सुधीर पिळणकर, अनिकेत सावंत, सागर कोलकार, अनिकेत घाटगे, श्री. साळुंखे, बाबुराव बल्लाळ, प्रविण बल्लाळ, मुरली बल्लाळ, नंदकुमार कांबळे, प्रमोद कांबळे, मनोज हळदणकर, उमेश तेली, प्रवीण नेसरीकर, शिवाजी इलगे, गुंडू चंदगडकर, प्रदिप कडते, शरद गावडे, सुरेश बागिलगेकर यांनी सहभाग घेतला होता.

अंजुमन ए ईस्लाम या मुस्लिम बांधवाच्या संघटनेच्या वतीने काल पाकिस्तानच्या दहशततवाद्यांनी भारतीय जवानावर केलेल्या भ्याड हाल्याचा तीव्र शब्दात निषेध करून तहसिलदार यांना निवेदन दिले. 

                                                                     कोवाड
कोवाड व्यापारी संघटनेच्या वतीने शहिद जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी काल झालेल्या भ्याड हल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला...निष्पाप जवानांच्या हत्येला कारणीभूत आसलेल्या व मानवतेच्या मुळावर उठलेल्या या दहशातवादच्या भस्मासुराला गाडून टाकण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत व दहशतवादाचा समुळ नायनाट करावा अशा भावना व्यापार्यांच्या वतीने मांडण्यात आल्या त्याअधि वंदे मातरम, भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, पाकिस्तान मुर्दाबाद, एवढा मोठा हिंदुस्थान, खड्यात घालु पाकिस्तान अशा घोषणा देत दुर्गामाता मंदिर पासून निषेध फेरीला सुरुवात झाली. शिवाजी पुतळा या ठिकाणी शहीद जवानाना श्रध्दांजली वाहण्यात आली. या वेळी कोवाड विभाग माजी सैनिक संघटनेच्या वतीने शनिवारी पुकारण्यात आलेल्या बंदला कोवाड बाजारपेठ संघटनेने सर्वानुमते पाठींबा जाहिर केला आहे. यावेळी बाजार पेठेतील बहुत:श व्यापारी वर्ग, ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

                                                               हलकर्णी फाटा 
काश्मीरमधील पुछलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात हलकर्णी फाटा येथे पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला व पाकिस्तान  मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी युवासेना तालुका प्रमुख प्रताप उर्फ पिनु पाटील,  कांग्रेसचे युवा तालुका अध्यक्ष संदीप शांताराम पाटील, भाजपा युवा उपतालुका प्रमुख संदीप नांदवडेकर,  कलाप्पा निवगिरे कामगार सेना अध्यक्ष कल्लाप्पाणा निवगिरे, भरमु उर्फ प्रदीप पाटील युवासेना उप तालुका प्रमुख, वैभव ल्हासे, दिलीप पाटील, संपत पेडणेकर यासह  नागरिक  उपस्थित होते.
                                                                    शिनोळी 
काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानावर  झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात शिनोळी फाटा येथे शिवसेना व शिनोळी फाटा येथील सर्व व्यापारी बंधू यांच्या वतीने  हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाकिस्तान धार्जिन  संघटनेने जो भ्याड हल्ला  केला त्या निषेधार्थ बेळगाव -  वेंगुर्ला रोडवर हे आंदोलन करून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेचा अदिलदार याच्या पुतळयाला चप्पल मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त जमावाने पाकिस्तानाचा झेंडा जाळला. उपस्थित नागरिकांनी यावेळी संतप्त भावनााा व्यक्त केंद्र सरकारने या हल्ल्याचा बदला घेऊन पाकिस्तानला धडा शिकवावा  अशा भावना व्यक्त केल्या.  हे आंदोलन शिवसेना उपजिल्हा प्रभाकर दादा खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलनात बाळासाहेब पाटील,गुंडु करटे , राजेंद्र मनोळकर, प्रताप सुर्यवंशी, गजानन पाटील, प्रशांत पाटील, सरपंच रमेश भोसले ,तानाजी खांडेकर , लक्ष्मण (दादा) किटवाडकर , आजित दादा खांडेकर ,नारायण ता पाटिल , राजू खांडेकर , बाळु जाधव , राजू किटवाडकर ,विकास पाटिल, प्रीतम पाटिल, शिवाजी उसूलकर, केतन खांडेकर, कार्तिक खांडेकर,  यांनी भ्याड हल्याचा निषेध केला.
                                                   चंदगड व कोवाड बाजारपेठ शनिवारी बंद
काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्लाचा निषेध नोंदविण्यासाठी व शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारी (ता. 16) चंदगड व कोवाड बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. कोवाड येथील माजी सैनिक संघटनेने या भ्याड हल्याच्या निषेधार्थ कोवाड बंदचा निर्णय घेतला आहे. यामध्ये व्यापारी संघटनेने पाठींबा दर्शविला आहे. त्यमुळे कोवाड बाजारपेठ बंद राहील. 

1 comment:

Unknown said...

नावं घालताना एक तर सगळ्याची घाला नाही तर घालू नका काम करणारा राहतो बाजुला आणि नावं नको त्यांची

Post a Comment