नाभिक व्यवसायावर परप्रांतीयांचे आक्रमण, व्यवसाय अडचणीत, अध्यक्षांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2019

नाभिक व्यवसायावर परप्रांतीयांचे आक्रमण, व्यवसाय अडचणीत, अध्यक्षांना निवेदन

माणगाव येथे परप्रांतीय नाभिक व्यावसायिकांचा बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन तालुकाध्यक्ष शंकर कोरी यांना देताना चंदगड तालुका नाभिक संघटनेचे पदाधिकारी. 

तेऊरवाडी / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात गेल्या हजारो वर्षापासून केवळ नाभिक समाजातील व्यक्तीकडून नाभिक - केस कर्तनालयाचा व्यवसाय चालू आहे. पण परंपरागत चालू असलेल्या या व्यवसायावर गेल्या महिन्यापासून परप्रांतीयांनी अतिक्रमण केल्यामुळे चंदगड तालुक्या बरोबर बेळगाव तालुक्यातील उचगाव परिसरातील नाभिक व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे नव्याने आलेल्या व या व्यावसायिकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी चंदगड तालुका नाभिक संघटनेच्या वतीने चंदगड तालुका अध्यक्ष शंकर कोरी यांना याबाबतचे निवेदन माणगाव येथील कार्यालयात दिले आहे. 
प्रत्येकाला व्यवसाय स्वातंत्र्य असले तरीही तो व्यवसाय करताना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन करावे लागते. पण या परप्रांतीयाकडून मनमानी पद्धतीने ग्राहकांची लूट केली जात आहे. आजही चंदगड बरोबर बेळगाव सिमा भागात खेड्यामध्ये बैत्याच्या मोबदल्यात केस कर्तन केले जाते. त्याचबरोबर गावातील धार्मिक विधी, बाराव्याचा विधी, घरातील एखादा रूग्ण अशांची सेवा देण्याचे काम येथील नाभिक समाज प्रामाणिकपणे गेली वर्षानुवर्षे करत आहे. चंदगड तालुका नाभिक मंडळाचे यावर नियंत्रण आहे. पण आता आलेल्या परप्रांतियांकडून मनमानी सुरु आहे. परिणामी चंदगड तालुक्यातील नाभिक व्यवसाय अडचणीत आला आहे. या विरोधात येथील नाभिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. नाभिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बामणे यांच्यासह सर्व नाभिक सदस्य प्रत्येक ग्रामपंचायतीला या संदर्भात निवेदन देणार आहेत. सिमा भागातील नाभिकानीही अशी निवेदने दिली आहेत. प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. याबाबतचे निवेदन चंदगड तालुका नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर कोरी यांना दिनकर शिवनगेकर, विष्णु बामणे, आशिष शिवनगेकर, प्रसाद वाडकर, सुनिल वाडकर, सुनिल सप्ताळे, वैजनाथ शिवनगेकर यांच्यासह अन्य व्यावसायिकांनी दिले आहे.  


No comments:

Post a Comment