आदमापूर येथे आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेवेळी उपस्थित पदाधिकारी. |
आदमापुर येथे आठ तालुक्यातील पत्रकारांची कार्यशाळा संपन्न
आदमापूर / प्रतिनिधी
पत्रकारितेमध्ये सध्या जीवघेणी स्पर्धा वाढलेली आहे. यामुळे पत्रकारांनी पारंपारिक पत्रकारिता सोडून देऊन नवनवीन आव्हाने स्वीकारत नाविन्यपूर्ण लिखाण आणि वेगळे विषय हाताळले तरच या स्पर्धेच्या युगात तो टिकू शकेल असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व नेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आदमापूर (ता.भुदरगड) येथे आठ तालुक्यातील पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत ' ग्रामिण पत्रकारीता 'या विषयावर ते बाेलत हाेते.अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य भास्कर चंदनशिवे हाेते. संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे व उदयोगपती सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. जाधव म्हणाले, इलेक्ट्रॉनिक आणि वेब माध्यमांच्या मुळे मुद्रित माध्यमांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे पत्रकारितेमधील नवीन कौशल्य व क्षमता आत्मसात करून ग्रामीण भागातील पत्रकारांनी ज्ञानसंपन्न होऊन अपडेट राहणे ही काळाची गरज बनली आहे. तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून एकत्र यायला हवे. अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी प्राचार्य भास्कर चंदनशिवे यांनी नकारात्मक पत्रकारिता बाजूला ठेवून सकारात्मक पत्रकारिता करण्याचे आवाहन केले .यावेळेला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा डॉ .जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व संघटनेमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांच्या हस्ते निवडपत्रे देण्यात आली. प्रथमतः पुलवामा भ्याड हल्यातील शहीद जवानांना व पत्रकार संघाचे दोन आकस्मित मृत सभासदांना श्रद्धाजंली वाहिण्यात आली. तदनंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उदयोगपती सुधीर पाटील यांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली. स्वागत शिवाजी खतकर व प्रास्ताविक महादेव कानकेकर यांनी केले. व्याख्याते डॉ. जाधव यांचा परिचय प्रा.शामराव पाटील यांनी करून दिला.
आदमापूर येथील पत्रकारांच्या कार्यशाळेसाठी उपस्थित आठ तालुक्यातील पत्रकार. |
प्रमुख उपस्थिती पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, कोषाध्यक्ष नंदकुमार कुलकर्णी, कौन्सील मेंबर नंदकुमार कांबळे, डॉ. निवास वरपे, जिल्हा संघटक प्रा. रविंद्र पाटील, अवधूत आठवले, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे, अनिल धुपदाळे, कोर कमिटी मेंबर भाऊसाहेब सकट, प्रा. अशोक पाटील, युवराज धनवडे, बाळासाहेब चोपडे,शशिकांत भोसले,कागल तालुका अध्यक्ष महादेव कानकेकर, मुरगूड शहर अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, हातकणंगले तालुका अध्यक्ष सचिनकुमार शिंदे,भुदरगड तालुका अध्यक्ष शिवाजी खतकर, राधानगरी तालुका अध्यक्ष अशोक पाटील,करवीर तालुका अध्यक्ष अमर वरूटे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष रविंद्र हिडदुगी, आजरा तालुका अध्यक्ष बशीर मुल्ला, चंदगड तालुका अध्यक्ष नंदकुमार ढेरे, निपाणी तालुका अध्यक्ष अनिल पाटील,आदींच्या नेतृत्वाखाली८तालुक्यातील पञकार उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद चव्हाण यांनी केले.आभार प्रकाश तिराळे यांनी मानले. या कार्यशाळेस खालीलप्रमाणे विविध दैनिक व इलेक्ट्रॉन मेडियाचे पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment