हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना चालवायला घेणाऱ्या अथर्व कंपनीला पाठींब्याबाबत चर्चा करताना कामगार वर्ग. |
शेतकऱ्यांची थकीत देण्याबरोबर काटा पेमेंट आणि कामगारांची देणी वेळेत देण्याच्या अटीवर दौलत बचाव कृती समिती, कामगार व शेतकरी यांनी अथर्व कंपनीला पाठिंबा दिला. दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड.संतोष मळविकर यांनी आज बोलावलेल्या हलकर्णी येथील गणेश मंदिरात बोलावलेल्या बैठकीत सदरची घोषणा केली. त्यामुळे दौलतला उर्जीत आवस्था प्राप्त होण्याचा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
चंदगड तालुका संघ, व अथर्व कंपनीने दौलतचे टेंडर भरले होते. तालुका संघ यांच्या आटी मान्य न झाल्याने के.डी सी सी बँकेने अथर्व कंपनीला दौलत 39 वर्षासाठी भाडे तत्वावर चालवण्यास देण्याची नोटीस बजावली होती. या संदर्भात दौलत चे कामगार व दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळविकर यांनी अथर्व कंपनीचे मानसिंग खोराते व बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची देणी, कामगार पगार व बँकेची देणी या संदर्भात चर्चा केली.परिणामी अथर्व कंपनीने साऱ्या आटी मान्य केल्याने आज हलकर्णी येथे बोलावलेल्या बैठकीत दौलत बचाव कृती समिती, कामगार ,शेतकरी सभासद यांनी दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष यांनी मांडलेल्या विषयांला एकमुखाने अथर्व कंपनीला पाठिंबा देण्याचे मान्य केले. यावेळी शिवसेनेचे जिल्ह्या उप प्रमुख प्रभाकर खांडेकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पोवार, राजेंद्र पावसकर, अनिल होडगे यांच्यासाहित बहुसंख्य सभासद,शेतकरी व कामगार वर्ग हजर होते.
No comments:
Post a Comment