खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते चंदगड समता सामाजिक बहुजन विकास फौउंडेशनचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2019

खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते चंदगड समता सामाजिक बहुजन विकास फौउंडेशनचे उद्घाटन

चंदगड येथील समता सामाजिक बहुजन विकास फौऊंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना संसदरत्न खासदार धनंजय महाडिक, शेजारी माजी मंत्री श्री. पाटील व इतर. 
माणगाव / प्रतिनिधी
बहुजन समाजासाठी केवळ एका व्यक्तीने कार्य करण्यापेक्षा डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनी समाज संघटित होण्यासाठी समता सामाजिक बहुजन विकास फौऊंडेशन संघटना आज चंदगड तालुक्यात कार्यरत होत आहे. बहुजन समाज आपला सामाजिक न्याय हक्कासाठी एकत्र येऊन जी चळवळ निर्माण करील त्यातून निश्निचत बहुजन समाज आपला विकास साधू शकेल असे मत संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. चंदगड येथील समता सामाजिक बहुजन विकास फौऊंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संध्यादेवी कुपेकर होत्या.
चंदगड तालुक्यातील समता सामाजिक बहुजन विकास फाऊंडेशन संस्थेच्या उद्घाटन समारंभ आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. सुरुवातीला विष्णू कार्वेकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. झेप संगीत अकॅडमीच्या कलाकारांनी देशभक्तीपर गीतांनी शहिदांना मानवंदना दिली. संसदरत्न खासदार धनंजय महाडिक म्हणाले ``पाश्चात्य देशात समाज विकासासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. आपल्या देशात त्याची कमतरता होती मी व माझी पत्नी सौभाग्यवती अरुंधती महाडिक आम्ही भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून खासदार होण्या अगोदर पासून बहुजन समाजासाठी कार्य करत आलो. त्यामुळे बहुजन समाजाच्या वेदना आपण जवळून पाहिल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी आम्ही या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि उभे राहणार आहोत. राजकीय पातळीवरून या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव समता सामाजिक बहुजन विकास फौउंडेशन ला आपले पाठबळ राहणार आहे असे अभिवचन यावेळी संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.``
फौउंडेशनच्या वतीने सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षा आमदार संध्यादेवी कुपेकर  बहुजन समाजातील कुणा एका व्यक्तीने स्वतःचा स्वार्थ साधण्यापेक्षा  समाजातील सर्व घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे. समाजातील प्रत्येक घर सुधारले तरच समाजाचा उन्नती होईल. बहुजन समाजासाठी आपण कोठेही कमी पडणार नाही फौउंडेशनच्या माध्यमातून लागणारी मदत केली जाईल असे सांगितले.`` माजी राज्यमंत्री भरमू पाटील म्हणाले ``या नव्याने स्थापन झालेल्या फौउंडेशनने बहुजन समाजातील प्रत्येक घटकातील लक्ष द्यावे मी चंदगड बहुजन समाजाचा सुधारक असून मी बहुजन समाजातील एखाद्या स्थानाला योग्य ठिकाणी योग्य संधी देऊन या समाजाला सन्मानित केले आहे. समता सामाजिक बहुजन विकास फौउंडेशनचा हा रथ हाकण्यास आपले पाठबळ असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.`` शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर, अँड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली. व्यासपीठावर फौउंडेशनचे  संस्थापक आर. पी. कांबळे, माजी उपसभापती अँड. अनंत कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक पाटील ,शिवाजी कांबळे माजी गोकुळचे संचालक शांती रत्न महादेव कांबळे,गोकुळचे माजी संचालक  नामदेव कांबळे, आलीसाहब सय्यद, पी.डी .सरवदे, डॉक्टर मकानदार, अजित व्हण्याळकर, मायाप्पा पाटील ,विनायक भोगण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए.आर.कांबळे यांनी केले तर आभार फौंडेशनचे सचिव भेबा कांबळे यांनी मानले.






No comments:

Post a Comment