![]() |
श्री क्षेत्र वैजनाथ देवालय देवरवाड़ी महाशिवरात्रि उत्सव |
चंदगड तालुक्यात ठिकठिकाणी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. भजन, प्रवचन, किर्तन, जागर, नाटक आदीचे नियोजन करण्यात आले होते. वैजनाथ मंदिर देवरवाडी, चंदगड, शेवाळे, कणवी (वाघोत्रे), चाळोबा (सातवणे), बिजूर, अडकूर, डूक्करवाडी (रामपूर), माडवळे, तूडये, माणगाव, ईब्राहिमपूर, बागिलगे, बसर्गे तूर्केवाडी, उमगाव व नांदवडे आदी ठिकाणी महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सकाळी शंकराच्या पिंढीला अभिषेक घालून काकडारती करण्यात आली. शेवाळे व कणवी येथे नाटकांचे तर वैजनाथ मंदिर व चाळोबा येथे किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. वैजनाथ मंदिर देवरवाडी, शेवाळे, कणवी येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. चाळोबा मंदिरात अलिबाग-मूबंईस्थित ग्रामस्थांनी ईतर ठिकाणीही महप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात सर्रास ठिकाणी उद्या महाप्रसादाने महाशिवरात्री उत्सवाची सांगता होणार आहे.
No comments:
Post a Comment