धुमडेवाडी येथे मेळाव्यात भरमू पाटील गटाचा धनंजय महाडिक यांना पाठींबा - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2019

धुमडेवाडी येथे मेळाव्यात भरमू पाटील गटाचा धनंजय महाडिक यांना पाठींबा

धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे मेळाव्यात बोलताना धनंजय महाडिक. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री भरमू पाटील, सचिन बल्लाळ, शांताराम पाटील, शामराव बेनके, शहाबुद्दीन नाईकवाडी आदी. 

चंदगड / प्रतिनिधी
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे माजी राज्यमंत्री भरमू पाटील गटाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये  भरमू पाटील गटाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांना जाहीर पाठींबा कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शामराव बेनके होते.
यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, ``ज्या पद्धतीने चंदगड वासियांनी भरमू आण्णांच्यावर प्रेम केले. त्याचप्रमाणे माझ्यावरही केले आहे. त्यामुळे माझी आज चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये ताकत वाढली आहे. ज्या लोकांना लोकसभा म्हणजे काय? खासदार म्हणजे काय? हे माहित नाही, त्यांना तुम्ही निवडून देणार का असे सांगून ते म्हणाले, ``ज्या घरामध्ये अनेक वर्षे सत्ता दिली. त्यांना पुन्हा सत्ता पाहिजे आहे. खासदारकीच्या काळात कोल्हापूरची विमानसेवा, रेल्वेसेवा, राष्ट्रीय महामार्ग, पेयजल योजना, बंद पडलेले सरकारी रुग्णांलये अशी केंद्राच्या माध्यमातून विकास कामे केली आहेत. मी केलेल्या कामाच्या जोरावर संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मला बिन कामाचा खासदार म्हणणाऱ्यांना हे उत्तर आहे.`` यावेळी सभापती बबनराव देसाई, उपसभापती विठाबाई मुरकुटे, माजी सभापती शांताराम पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, युवा नेते प्रताप सुर्यवंशी, पं स. सदस्या मनिषा शिवनगेकर,  नाना डसके, मोहन परब यांच्यासह विविध गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्था व दुध संस्थेचे चेअरमन, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहाबुद्दीन नाईकवाडी, महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील, गोकुळ संचालक दीपक पाटील, प्रताप सूर्यवंशी, शांताराम पाटील, बबनराव देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. शामराव बेनके यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment