![]() |
संग्रहित छायाचित्र |
निट्टूर ग्रामस्थ व बलभिम तालीम मंडळ यांच्या संयूक्त विद्यमाने निट्टूर (ता. चंदगड) येथे गूढी पाडव्या निमित्त शनिवार 6 एप्रिल 2019 रोजी दुपारी 2 वाजता निकाली कूस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. या मैदानात प्रथम क्रमाकांची कूस्ती महाराष्ट्र चॅपिंयन पै.बाळू पूजारी (इचलकंरजी) विरूद्ध कर्नाटक केसरी विजेता पै रविशचंद्र मूद्देबिहाळ (विजापूर) तर दोन क्रमांकाची कूस्ती महाराष्ट्र चॅपिंयन पै प्रशांत जगताप विरूद्ध महाराष्ट्र चॅपिंयन पै शूभम पाटील यांच्यात होणार आहे. याशिवाय या मैदानात चटकदार 70 निकाली कूस्त्या शौकीनाना पहावयास मिळणार आहेत. आखाडा पूजन पै.गावडू पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कूस्त्यांचा लाभ कुस्ती शौकीनांनी घ्यावा असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment