चंदगड / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील तीन हॉटेल व बारमालकांनी रात्री उशिरापर्यंत हॉटेल व बार सुरु ठेवून आचारसंहितेचा भंग केला. सोमवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी तीनही हॉटेल व बारमालकांवर चंदगड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
लोकसभेची आचारसंहिता सुरु असून या कालावधीत आचारसंहितेच्या नियमानुसार ठरवून दिलेल्या वेळेतच हॉटेल सुरु ठेवायची असतात. आचारसंहिता कालावधीत सी. आर. पी. सी. 144 प्रमाणे बंदी आदेश जारी केला आहे. असे असतानाही सुपे आरटीओ नाका येथील हॉटेल हिल टॉप बार ॲन्ड रेस्टॉरंट, शिनोळी येथील डिलक्स बार ॲन्ड रेस्टॉरंट व पाटणे फाटा येथील सेजल बार ॲन्ड रेस्टॉरंट यांच्या मालकांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा चंदगड पोलिसात दाखल झाला आहे. चंदगड पोलिस रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून उपनिरिक्षक श्री. पोवार करत आहेत.
No comments:
Post a Comment